परिचय

सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली

“सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन.” या कवी माधव यांच्या ओळी साक्षात जगणारा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा .एका बाजूला कोंकण प्रदेशातील अरबी समुद्रातील स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे आणि दुसरीकडे सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा, सिंधुदूर्ग व विजयदूर्ग असे ऐतिहासिक किल्ले आहेत. या जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली, तो रत्नागिरी जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ‘सिंधुदुर्गनगरी’ असून, सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.

PWD Office Kankavali

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदूर्ग यांचे अधिनस्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली हे कार्यालय कार्यरत आहे.

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीपत्याखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवली, वैभववाडी, देवगड व सिंधुदुर्ग नगरी हे उपविभाग कार्यरत आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्गमित व पथदर्शीत केलेल्या सेवा सौजन्यपूर्वक वागणुकीने उपलब्ध करून तसेच ईमारती, पूल व रस्ते यांची दर्जेदार कामे करून बांधकाम खात्याविषयी जनसामान्यात आपलेपणाची भावना तयार करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.

क्रमांक उपविभागाचे नाव
1 सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कणकवली
2 सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वैभववाडी
3 सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवगड
4 सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सिंधुदुर्ग नगरी